सिटीझन कौन्सिल च्या वतीने प्रजासत्ताक दिन आणि ख्रिसमस सुट्टी काळात हॉलिडे स्पेशल रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली होती. त्यातील बेळगाव बंगळुरू दरम्यान साठी हॉलिडे स्पेशल ट्रेन देण्यात आली आहे .दक्षिण पश्चिम रेल्वेच्या वतीने या विशेष गाडीची घोषणा करण्यात आली आहे .
मागी महिन्यात सिटीजन कौन्सिलचे सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वात रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रजासत्ताक दिन आणि ख्रिस्तमस साठी निवेदन हॉलिडे स्पेशल गाडी देण्याची मागणी करण्यात आली होती त्यातील एका गाडीची पूर्तता करण्यात आली आहे .
गाडी क्रमांक ०६५८१ यशवंतपूर (बंगळुरू हुन २२ डिसेंबर शुक्रवारी रात्री ८: १५ वाजता बंगळुरू हुन बेळगाव कडे निघणार असून २३ डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी ८ :१० वाजता बेळगाव ला पोचणार आहे तर २५ डिसेंबर रोजी सोमवारी रात्री ७ : १० बेळगाव हुन बंगळुरू कडे प्रयाण करणार असून २६ डिसेंबर मंगळवारी सकाळी ६:२० वाजता बंगळुरू (यशवंतपूर)ला पोचणार आहे . ही गाडी १६ डब्याची असणार असून १ २ टायर ए सी ३ ३ टायर ए सीतर दोन सामान्य डबे असणार आहेत