शिवाजी महाराजांचं नाव बेळगाव सह सीमाभागातल्या प्रत्येक युवकांच्या हृदयात असते केवळ शिवजयंती पुरते शिवाजी महाराजांचे नाव आठऊन मग वर्ष भर न विसरता अनेक युवक महाराजांचं अनुकरण करताना दिसत आहेत. कित्येक युवकात आज महाराजाप्रमाणे दाढि सोडणे कानात रिंग घालणे कपाळावर राज टिलक लावणे असे प्रकारही पाहायला मिळतात. अशाच वडगांव भागातील एक युवकाने आपल्या मुलाचा नामकरण सोहळा शिवशाही पद्धतीनं केला आहे.
सचिन परशराम घाडी असे या युवकाचा नाव असून तो एल आय सी एजंट आहे.मंगळवारी वडगांव येथील अनुसया मंगल कार्यालयात शिवशाही पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे प्रवेश द्वारा वर तुतारी वाजून स्वागत करण्यात येत होते इतकंच नाही तर सचिन यांनी आपल्या मुलाचे नाव देखील महाराजावर आधारित ‘शिवांक’ असे ठेवलं आहे.मंचावर आगमना वेळी सचिन हे शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत तर त्यांची पत्नी तृप्ती या देखील सईबाई च्या वेषभूषेत होत्या.या सोहळ्याला वडगांव भागाचे नगरसेवक मनोहर हलगेकर, खानापूर रहिवाशी संघटनेचे प्रेमानंद गुरव,दिगंम्बर पवार सह वडगांव जुने बेळगाव भागातील अनेक जणांनी उपस्थिती लावली होती
गेल्या आठवड्यात बेळगावात महानाट्य जाणता राजा चे प्रयोग करण्यात आले त्यामुळेच मराठी शिवमय वातावरण निर्माण होताना दिसत आहे.
हा उपक्रम आदर्श आहे, मात्र खरोखर आज बेळगावात युवकांनी मराठी अस्मितेसाठी केवळ वेशभूषा न करता गनिमी काव्याने मराठी संस्कृती अस्मिता जपण्याची गरज आहे.