सोमवारी रात्री उशिरा खडक गल्ली सह संवेदनशील परिसरात दोन गटात झालेल्या दगडफेक जाळपोळ प्रकरणात आणखी १३ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून खडे बाजार पोलिसांनी चौघा जणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.खडे बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन शिंदे १८ तुषार शिंदे १९ रा भडकल गल्ली,संजय पाटील ३० ,राम गुलबकर ३४ रा खडक गल्ली या चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे तर खालील सुमित गायकवाड,शुभम शंकर कंग्राळकर,गणपती नंद्गडकर,संजय जाधव,शिवाजी जाधव ,शुभदा जाधव,स्वरांजली जाधव,प्रसाद इंद्रकुमार शिरोळकर,शुभम गुलबकर यांच्या वर गुन्हे नोदन करण्यात आले आहेत.पोलिसांनी आय पी सी कलम १४३,१४७, १४८, १५३अ, ५०४ , ५०६ अन्वये दोन धर्मियात तेढ निर्माण करणे,सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणे गटाने मारामारी करणे असे गुन्हे नोंदवले आहेत.
Less than 1 min.
Previous article
Next article