बेळगाव जिल्ह्यात मराठीचे प्राबल्य वाढेल या भीतीनेच बेळगाव जिल्हा विभाजन कन्नड संघटना कडून विरोध होत आहे . गोकाक आणि चिकोडी हे दोन नवीन जिल्हे करण्यास कन्नड संघटनेचे नेते जेष्ठ पत्रकार पाटील पुटप्पा यांनी विरोध केला केला आहे . बेळगाव शहरातील कन्नड संघटना नेते वकील यांची कन्नड साहित्य भवनात बैठक झाली या बैठकीत बेळगाव जिल्हा विभाजन करण्यास तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . नांगनूर रुद्राक्षीमठ स्वामीजी यांच्या उपस्थितीत हि बैठक मंगळवारी झाली आहे .
जे एच पटेल यांनी मुख्यमंत्री असताना बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा घाट घातला होता मात्र त्यावेळी आंदोलन करून हा निर्णय बदलायला लावला होता बेळगाव सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात असे पर्यंत बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होऊ देणार नाही याला आमचा विरोध असेल आता सरकारने जो घाट . घातला आहे त्याविरोधात आंदोलन करू असं पाटील पुटप्पा या बैठकीवेळी म्हणाले .
राजकारण करण्यासाठी जर का बेळगाव जिल्ह्याचं विभाजन होत असेल तर तरवार आंदोलन करू असं देखील पुटप्प यांनी स्पष्ट केलं आहे . या बैठकीत अशोक चंदरगी , सह अन्य कन्नड संघटनेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते .