खडक गल्ली परिसरात झालेल्या दगडफेक जाळपोळ प्रकरणी संमाजकंटकांकडुन आणि पोलिसांकडून टारगेट झालेले पत्रकाराना संरक्षण पुरवा आणि फोटो ग्राफरांना मारहाण केलेल्यावर कारवाई करा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
सोमवारी रात्री खडक गल्ली परिसरात समाज कंटकांनी विजय मोहिते आणि रवी भोवी यांचा कॅमेरा हिसकावून घेतला होता आणि धककबुक्की केली होती याशिवाय पोलिसांनी देखील एका फोटो ग्राफर शी धक्का बुक्की केली असल्याची तक्रार पत्रकारांनी केली.यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचा दौऱ्या नंतर शांतता समितीची बैठक घेऊन पत्रकारांच्या समस्या सोडवू अस आश्वासन दिलं यावेळी विविध वृत्त वाहिन्या दैनिकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.