गांजा च्या नशेसाठी पैसे नाहीत म्हणून सध्या रात्रीच्या वेळी रस्त्याने ये जा करणाऱ्या दुचाकी स्वारांची लूट सुरू आहे. पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या लुटारूंचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने करावा लागणार आहे.
गरिबी वाढली की चोऱ्या आणि दरोडेखोरीच्या घटना वाढतात. मात्र सध्याच्या लुटी नशेखोर करत आहेत. गांजा सारख्या व्यसनाच्या आधीन गेलेल्या वाईट प्रवृत्ती ही लूटमार करत आहेत, मात्र सध्यातरी यापैकी ४ जणांना अटक करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही याचा फटका रात्रीच्या वेळी ये जा करणाऱ्यांना बसत आहे.
अचानक वाहन थांबवून हे लुटारू हल्ले करत आहेत. निमूटपणे सर्वकाही दिले तर बरे नाहीतर जखमी करून सोडत आहेत, अशा घटना वाढत असून रात्रीची गस्त कमी झाल्याचा फायदा हे लुटारू घेत आहेत. यासाठी सर्व मार्गावर पोलीस तैनात करण्याची गरज आहे.
पोलिसांनी युवा वर्ग तसेच ठिकठिकाणी स्थापन केलेले बीट यांचा वापर करून रात्रीच्या वेळी शहर जागते ठेवणे महत्वाचे आहे, याचा विचार करावा.