भारत आणि मालदीव सैन्याच्या संयुक्त लष्करी कवायतींना बेळगावातील मराठा इन्फ्रंट्री रेजिमेंटल केंद्रात शुक्रवार पासून सुरुवात झाली . या निमिताने मराठा सेंटरच्या मेजर तळेकर ड्रिल क्वाटर गार्ड वर शानदार उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातील भारतीय सेनेच्या दोन हेलिकॉप्टरनी आकाशातून दोन्ही देशांच्या ध्वजासह फेरी मारून सलामी दिल्यावर ब्रेगेडीयर गोविंद कलवड यांनी परेड निरीक्षक केलं. गोरखा बटालियन च्या जवानांनी उत्कृष्ट पाईप बँड वादन केलं तर बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे येथील शीख तुकडीने घटका मार्शल आर्ट शानदार चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर केली.
बेळगावात आगामी १४ दिवस होणारी भारत आणि मालदीव सेनेची ८ वी संयुक्त लष्करी कवायत असून दोन्ही देश दशहतवादी विरोधी कारवाया बद्दल एकमेकात देवाण घेवाण करणार आहेत . पाचव्या गोरखा बटालियनच्या ८ व्या गोरखा रायफल्स च्या कर्नल वधू विशिष्ट यांच्या नेतृत्वात ३ जे सी ओ ३९ जवान तर मालदीव राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडंट मोहम्मद शिनाल यांच्या नेतृत्वात ३९ जवान सहभागी होणार आहेत . १५ डिसेंबर २४ डिसेंबर दरम्यान या संयुक्त कवायती बेळगावात होणार आहेत .
दशहतवाद विरोधात लढण्यासाठी ऑपरेशन करण्यास दोन्ही देशाना ही संयुक्त कवायद उपयुक्त ठरणार असून दोन्ही दल एकमेकांकडून शिकणार आहेत . २००८ ते २०१३ पर्यंत बेळगावात मिलिटरी सेंटर मध्ये संयुक्त कवायती होत होत्या बांधकाम सुरु असल्याने बंद होत्या त्या आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. अशी माहिती मराठा सेंटरचे ब्रेगेडीयर गोविंद कलवड यांनी दिली
आता पुन्हा बेळगावात विदेश भारतीय सैन्याच्या कवायती सुरु होतील बेळगावातील मिलिटरी सेंटर मध्ये कमांडो विंग आणि प्रशिक्षण केंद्रात सर्व सुविधा आम्ही पुरवणार आहोत असं देखील कलवड म्हणाले