गेली 61 वर्ष प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सुटावा यासाठी बेळगावातील मराठी साठी योगदान देत असलेले समितीचे नेते बऱ्याच दिवसांनी एकाच व्यासपीठावर येत आहेत.
निमित्त आहे लोक शाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे 8 व्या साहित्य संमेलनाचे…
शनिवार पासून बेळगावात दोन दिवस या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात 16 डिसेंम्बर शनिवारी दुपारी अडीच वाजता मराठा मंदिरात ‘माझी मैना गावावर राहिली’एक चिकित्सा या सीमा प्रश्नावर आधारित परिसंवादाचे आयोजन केले आहे.या निमित्ताने समितीचे तिन्ही दिगगज एकाच व्यासपीठावर असणार आहेत.
या परिसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर तर प्रमुख वक्ते मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर हे सहभागी होणार आहेत.
गेली कित्येक वर्षे हे नेते एकाच व्यासपीठावर आले नव्हते मात्र साठे संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित येणार आहेत.आगामी पाच महिन्यात विधान सभा निवडणूका आहेत त्यामूळे समिती नेते एकाच व्यासपीठावरुन काय बोलणार याकडे मराठी जनतेच लक्ष लागलं आहे.