भारतीय महिला अ संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात तब्बल ४० धावांनी विजय मिळवत तीन सामान्यांच्या मालिकेत २-० अशी मालिका विजयी आघाडी मिळवली आहे. सलामीवीर जेमिमा आर आणि तानिया भाटिया यांची फटकेबाजी कोल्हापूरची कन्या कर्णधार तनुजा पाटील हिच्या अष्टपैलू कामगिरी आजच्या भारतीय महिलांच्या खेळाची खास वैशिष्ट्ये ठरली.
भारताने निर्धारित २० षटकात १५२ धावा काढल्या त्यात जेमिमा आर 42 चेंडूत 63 धावा तर तानिया भाटिया ३९ चेंडूत 39 आणि अनुजा पाटील 22 चेंडूत ( २८ ) धावांचे योगदान दिले.बांगला देशाच्या वतीने जहानुरा आलम ४ शतकात ३१ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले .
प्रत्त्युत्तर दाखल खेळताना बांगला देश ने २० षटकात ८ गड्यांचा मोबदल्यात ११२ धावा केल्या . भारत तर्फे कर्णधार अनुजा पाटील हिने ४ षटकात १९ धावत २ गडी बाद केले .