बेळगाव ते खानापूर रस्ता रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. ३० किमी मार्गाच्या उभारणीस नियोजित ८९६.८१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही निविदा काढली आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र ४ मध्ये मोडतो.निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास २०१८ च्या पूर्वार्धात कामाला सुरुवात होऊ शकते. ९१० दिवसात रस्त्याची पूर्ण उभारणी करण्याची अट आहे.
बेळगाव शहरातील कॅम्प येथील फिश मार्केट येथे या मार्गाचा शून्य किमीची बोर्ड आहे तेथून सुरुवात करून ३० किमी म्हणजेच खानापूर शहराच्या शेवटपर्यंत हा मार्ग येतो. बेळगाव ते पणजी ही दोन महत्वाची व्यापार केंद्रे हा मार्ग जोडतो.
या मार्गावर बेळगाव पासून १९.२०० किमीवर एक टोल नाका उभारणीचाही प्रस्ताव आहे.चौपदरीकरणाच्या कामात वन विभाग तसेच काही खासगी जागाही संपादित केली जाणार आहे.
शून्य ते १५.४ किमी पर्यंत ६० मीटर रुंद खासगी जागा, १५.४ किमी पासून २२ किमी पर्यंत ४५ मीटर रुंद असंरक्षित वन आणि खासगी जागा,२२ ते २७.९ किमी टप्प्यात ६० मीटर रुंद खासगी जागा आणि २७.९ ते ३० किमी टप्प्यात ४५ मिटर रुंद असंरक्षित वन या मार्गात जाणार आहे.