पुढील महिन्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बढत्या आहे त्या नंतरच खाली असलेलं बेळगाव पोलीस आयुक्त पद भरण्यात येईल असे स्पष्ट संकेत गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिले आहेत.
बेळगाव दौऱ्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नी ते बोलत होते.बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयासाठी दोन जागांची पहाणी करण्यात आली असून लवकरच त्यातील एक जागा निवडण्यात येईल असं देखील रेड्डी म्हणाले.
गृहमंत्री रेड्डी यांच्या वक्तव्या मुळे पुन्हा नवीन पोलीस आयुक्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार हे स्पष्ट झाले आहे