एकीकडे महाराष्ट्रात जादूटोणा विधेयक संमत होवून सुद्धा त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही दुसरीकडे कर्नाटक सरकारचे माजी मंत्रीच नागरिकांच्या मना मध्ये असणारी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्वतः चक्क स्मशानभूमीत राहून लोकांचं प्रबोधन करताहेत .
कर्नाटक विधान सभेत बेळगावातील अधिवेशनात जादूटोणा विधेयक मंजूर करण्यात आले असले तरी गेली तीन वर्षे माजी मंत्री सतीश जारकीहोळी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून नागरीकांचं प्रबोधन करत आहेत.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बेळगाव शहरातील सदाशिव नगर मधल्या स्मशानभूमीत एक रात्र वस्ती राहून रात्रभर अंधश्रद्धा जनजागृती साठी चे कार्यक्रम राबवणार आहेत . बेळगावातील स्मशान भूमीत बुधवारी दिवस भर आणि रात्रभर जनजागृतीचे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येनंतर महाराष्ट्रात जादूटोणा विध्येयक तत्कालीन कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारतर्फे संमत करण्यात आलं मात्र या विध्येयकाची अंमलबजावणी होऊन सुद्धा महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक अघोरी प्रथा पाहायला मिळाल्या आहेत . बेळगावातील माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनोख्या कार्यक्रमात बेळगाव अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकार्यांनी सुद्धा भाग घेतला आहे.