बेळगाव शिवारात एक बासमती भात तर दोन वाळलेल्या चाऱ्याच्या गंज्या जळून भस्मसात झाल्याने हजारोंच नुकसान झालं आहे.
बेळगाव शिवारातील समर्थ नगरच्या पाठीमागे असलेल्या बेळगाव शेतकऱ्यांच्या पिकाऊ शेती आहे तेथील पंडीत,मल्लाप्पा,विजय गेंजी या ताशिलदार गल्ली यांच्या दोन दिवसापूर्वीच भाताची मळणी करुन ठेवलेल्या दोन गंज्या जळून भस्मसात झाल्या तर भांदूर गल्लीतील मनोहर कणबरकर यांची बासमती भाताची घातलेली गंजी पेटत होती.सकाळी शेतकरी शेताकडे गेल्यावर हा प्रकार पाहून सर्व शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत पाण्याची गाडी ताबडतोब बोलावली अन्यथा लागुनच आणखी दोन बासमतीच्या गंज्या पेटतील म्हणून जळत असलेली गंजी बाजूला काढून पसरले आणी त्यावर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणून विझवली अन्यथा हजारो रुपयांच शेतकऱ्याच नुकसान झाल असत.
याची खबर तातडीने बेळगाव सर्कल,तलाठी तसेच एपीएमसी सदस्य यांना दिली व तत्पर तलाठ्यानी पंच नामा केला.तर प्रत्यक्ष शेतात बेळगाव एपिएमसी सदस्य तानाजी पाटील यांनी येऊन पहाणी करत शेतकऱ्यांच्या हातातोडांला आलेल्या पिकाचे असे नुकसान पाहून दुख व्यक्त करत शासन दरबारी मदत मिळवून देण्यासाठी माझ्यापरीने प्रयत्न करतो असे सांगत जो गरीब शेतकरी ते शेत कसतो त्याला आर्थिक मदत केली.त्यामुळे तिथे जमलेल्या शेतकऱ्यात थोडे काहोईनां समाधान झाले आहे.