एकीकडे समाज कंटकांनी दगडफेक करून बेळगाव दक्षिण भागातील सामाजिक सलोखा बिगडवण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे मात्र अळवण गल्ली पंचानी मदरसा उद्घाटन कार्यक्रमात सहभाग दर्शवत धार्मिक सलोखा दाखवत आम्ही सगळे एकच आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.या मराठी भाषिक पंचांनी मुस्लिम उर्दू शिक्षणा साठीच्या मदरश्या उदघाटन सोहळ्यातील सहभागाने या भागातील सलोखा वाढला आहे आणि उद्देश्य ठेऊन कार्य करणाऱ्यांना चपराक दिली आहे
नुकताच शहापूर अळवण गल्लीत उर्दू मदरश्याच उद्घाटन करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी,नगरसेवक शिवाजी कुडूचकर, अळवण गल्लीतील मुख्य पंच गोविंदराव काकतकर,देवेंद्र पाटील ,संजीव कागळे,शेखर चव्हाण, फारुख हन्नान, सलाउद्दीन तोरगल आदींनी सहभाग दर्शवला होता.
जीवनात सर्व समाजाच्या विकासात शिक्षणाचे योगदान महत्वाचे असून सर्वांनी शिकायला हव तरच देशाचा विकास शक्य आहे अस मत पोलीस जावेद मुशाफिरी यांनी व्यक्त केल. शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील सी ई टी परीक्षेत पहिल्या शंभर मध्ये आलेल्या विध्यार्थ्यास ५० हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा देखील जावेद यांनी यावेळी केली.
यावेळी मुस्लीम समाजच्या वतीने अळवण गल्ली मुस्लीम जमात, नवी गल्ली वडगाव आणि जोशी गल्लीतील जमात सदस्य देखील हजर होते.