शाळेतील विशेषतः हायस्कुलमधील जुन्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयाच्या कप्प्यात बसलेल्या असतात अश्याच आपल्या हायस्कुल जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा ठळकवाडी हायस्कुलच्या १९९८ बॅच च्या दहावीच्या विध्यार्थ्यानी दिला आहे .
तब्बल २० वर्ष नंतर हे सगळे विध्यार्थी एकत्रित जमले होते त्यांनी केवळ आठवणींना उजाळा न देता आपलं कर्तव्य म्हणून माजी मुख्याध्यापक जे व्ही खांडेकर,सध्या कार्यरत असलेले शिक्षक सी व्ही पाटील आजी माजी शिक्षक आणि कर्मचारी सह्या एकूण १७ जणांचा सत्कार देखील केला आहे .
या निमित्ताने हायस्कुल मध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्यध्यापक जे व्ही खांडेकर यांनी भूषविले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे शानभाग उपस्थित होते . एकूण ६० माजी विध्यार्थ्यानी या कार्यक्रमास हजेरी लावली होती . शिक्षकांच्या वतीने सावंत यांनी तर विजापूर जे एम एफ सी कोरतात न्यायाधीश असलेले माजी विद्यार्थी दीपक पाटील विध्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत गुरुजन आणि कर्मचारी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आर्थिक मदत देखील देऊ केली .