पोलीस आयुक्त टी जी कृष्णभट्ट गुरुवार 30 रोजी सेवा निवृत्त झाल्यावर बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक रामचंद्र राव यांना सोपवण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या औपचारिकतेच्या कार्यक्रमात कृष्ण भट्ट यांनी आय जी पी रामचंद्र राव यांच्याकडे प्रभार पोलीस आयुक्ता चा पदभार सोपविला.यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर अमरनाथ रेड्डी उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती होई पर्यंत आय जी पी रामचंद्र राव यांच्याकडे बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार असणार आहे.पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली जाणार आहे.मुख्यमंत्री आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यास बेळगावला पाठवतील अशी देखील माहिती मिळत आहे.