Tuesday, May 7, 2024

/

 संघटना बळकट करून विभागवार मेळावे घेण्याचा बैठकीत निर्धार

 belgaum

समिती संघटना बळकट करून आगामी काळात सीमा प्रश्नाच्या जनजागृती साठी विभागवार बैठका मेळावा घेण्याचा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जत्ती मठात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष वाय बी चौगुले होते.

व्यक्ती पेक्षा संघटना महत्वाची असून कोणी राष्ट्रीय पक्षात सामील झाले म्हणून संघटना संपणार नाही त्याउलट जोमाने कामाला लागून संघटना बळकट करू असे प्रास्तविक सरचिटणीस मनोज पावशे यांनी मांडले.कुणी राष्ट्रीय पक्षात गेल म्हणून निवडणुकीत आमचा रस्ता मोकळा झाला म्हणणाऱ्या हेकेखोराना आम्ही संघटना बळकट करून धडा शिकवू असा mes meeting टोला सुळगा येथील अशोक पाटील यांनी लगावला.

आमच्यातले केवळ सुंठकर गेले आहेत कार्यकर्ते गेले नाहीत माझी समिती म्हणणाऱ्यानी आपल्या संघटनेतील किती कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षात जायलेत याचा विचार करावा असा प्रश्न भावकाना पाटील यांनी उपस्थित करत एकी करायची असेल तर आम्ही तिकडे जाणार नाही त्यांनी जत्ती मठात येऊन एकी करा असा अवाहन देखील त्यांनी यावेळी केल.

 belgaum

खाल्या घरचे वाशे मोजणाऱ्याचा निषेधाचा ठराव

सर्व मराठी जनता समितीनिष्ट आहे याचा विचार करत मराठी जनतेचे मुखपत्र असलेल्या तरुण भारत ने सीमा लढ्याचा महा संग्राम लेखमाला सुरु केल्याने अभिनंदनाचा तर समितीला सोडून भाजपात जाऊन खालेल्या घरचे वाशे मोजणाऱ्या माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या विरोधात निषेध ठराव देखील मांडण्यात आला.बैठकीत ए पी एम सी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, सुनील अष्टेकर, भावकाना पाटील,यल्लाप्पा बेळगावकर ,सुरेश डुकरे,पिराजी मुचंडीकर, मराठी भाषिक युवा आघाडीचे भाऊ गडकरी आदी उपस्थित होते.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.