मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून गोकाक आणि चिकोडी असे तीन जिल्हे करू असे संकेत देताच बेळगावातील कानडी संघटनांनी जिल्हा विभाजनास विरोध सुरु केला आहे. कन्नड संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जिल्हा विभाजनास विरोध असल्याचे स्पष्ट केलं आहे .
जिल्ह्याचं विभाजन केल्यास महाराष्ट्र एकीकरण समिती आणखी बळकट होईल बेळगाव जिल्ह्यात मराठीचे प्राबल्य वाढेल अशी भीती कन्नड संघटनांना आहे यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बेळगाव प्रश्न सुप्रीम कोर्टात असे पर्यंत जिल्हा विभाजन करून नये अशी मागणी माजी महापौर सिद्देनगौडा पाटील यांनी केली आहे. तालुका पंचायत जिल्हा पंचायत देखील मराठीचे प्राबल्य वाढेल म्हणूनच कन्नड संघटना विरोध असल्याचं कबुली कन्नड पत्रकार समोर दिली आहे . बेळगावातल्या कन्नड अस्मितेला तरा शोची असे कृत्य सिद्धरामय्या यांनी करू नये कन्नड संघटनांना विश्वासात घ्यावे अशी मागणी देखील कन्नड संघटनेचे नेते अशोक चंदरगी यांनी केलं आहे