सन्मान हॉटेल जवळून वळण घेताना भरधाव कार ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
स्मिता गजानन जाधव वय ४५ रा. भडकल गल्ली बेळगाव अस अपघातात मयत झालेल्या महिलेच नाव असून त्यांचे पती गजानन जाधव वय ५५ रा भडकल गल्ली हे जखमी झाले आहेत जखमीवर के एल ई इस्पितळात उपचार सुरु आहेत.
रहदारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन जाधव हे रात्री दीड च्या सुमारास चन्नमा सर्कल कडून दुचाकी वरून येत होते. हॉटेल सन्मान कडून डावीकडे वळसा घेताना मागून येणाऱ्या जेष्ठ कार (ka 22 m 2125) याने जोराची धडक दिली यात दुचाकीवर स्वार असलेल्याच्या डोक्याला जबर जखम झाली होती. कार चालकांनी भरधाव वेगाने धडक देऊन पलायन केले यावेळी दोघा जखमींना उपचारा साठी के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र स्मिता यांच्या डोक्याला मार बसल्याने उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाल आहे. चांदू गल्लीत गजानन जाधव यांचे रेशन दुकान आहे.
भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रहदारी दक्षिण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.