आपल्या स्वतःच्या मुलीचा वाढदिवसाला मौज – मजा वायफळ खर्च याला फाटा देत अनाथ एच आय व्ही बाधित मुलीच्या लग्नाला साड्यांची मदत देऊन वेगळा आदर्शवत उपक्रम बेळगावातील शहापूर येथील युवा कार्यकर्ते सतीश गावडोजी यांनी राबवला आहे.
रेल नगर येथील नंदन अनाथ मुलाच्या आश्रमातील अनाथ मुलीच्या लग्नासाठी म्हणून 20 साड्या मदत दिल्या. आगामी 4 डिसेंबर रोजी अनाथ नववधुचा विवाह होणार आहे. सतीश गावडोजी यांनी आपली कन्या स्वरा हिच्या दुसऱ्या वाढदिवसा निमित्य हा उपक्रम केला आहे.
सतीश यांनी केवळ याच वर्षी मुलीच्या वाढदिवसा निमित्तानं हा उपक्रम केला नसून, मागील वर्षी स्वराच्या पहिल्या वाढदिवसा निमित्य सिव्हिल हॉस्पिटल मध्ये 108 अम्ब्युलन्सच्या चालकांना नवीन ड्रेस भेट दिला होता. इतरांच्या मानानं आपण खूप सुखी जीवन जगतो आहोत. याचा विचार प्रत्येक व्यक्तीनं करून वंचित घटकांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच या दातृत्वाच्या घटनेतून अधोरेखित होतय. शनिवारी रेल नगर अनाथ आश्रमात झालेल्या कार्यक्रमात महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते साड्या मदत दिल्या .यावेळी माजी महापौर सरिता पाटील नगरसेविका अनुश्री देशपांडे,पुष्पा पर्वतराव युवा मंच चे नारायण किटवाडकर आदी उपस्थित होते.