स्टार बिझनेस क्लास प्रकारात मोडणारे चान्सरी पॅव्हीलियन हॉटेल बेळगावात लवकरच दाखल होत आहे. ५५ रूम चे हॉटेल सुरू होणार आहे. खानापूर रोड वर डी मार्ट नजीक एक स्थानिक भागीदाराच्या माध्यमातून ही आलिशान सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
या नव्या हॉटेलसाठी तज्ञ कामगार भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून जॉब देणाऱ्या साईट्स जाहिरातींनी भरल्या आहेत.
हे एक जबरदस्त सोयीने सज्ज हॉटेल असेल, बिझनेस आणि लेजर क्लास प्रवाशांसाठी ते सर्वप्रकारच्या सुविधा देईल. जास्तकाळ राहणाऱ्या प्रवाशांसाठी विचारपूर्वक सजवलेल्या रूम्स हे आकर्षण असेल.
नवीन वर्षात बेळगाव ला परफेक्ट डेस्टिनेशन शोधणाऱ्या प्रवाशांना एक नवी संधी असेल.
Trending Now