जो पक्ष राज्यात दारूबंदी करील त्याच पक्षाला आगामी निवडणुकीत पाठिंबा देऊ असे संकेत नागनुर स्वामीजींनी दिले आहेत दारू बंदीच्या निषेधार्थ २ डिसेंबर रोजी बेळगावात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाळा कॉलेजातील विध्यार्थ्यासह समाजातील अनेक विचारवंत या चर्चा सत्रात सहभागी होणार आहेत . सच्चिदानंद हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली दारू बंदी निषेध महामंडळ होते मात्र सध्या अस्तिवात नसून समाजाला शाप ठरलेले दारू बंदी झालीच पाहिजेत से देखील ते म्हणाले. कॉंग्रेस सरकारने या मद्यपान महा मंडळांलास सक्रीय करावे एकीकडे अबकारी खात्याकडून दारू विक्री केली जाते तर दुसरीकडे मध्यपान महा मंडळा द्वारे दारू बंदी प्रयत्न केलेलं जातात हे विशेष आहे.
पर्यावरणवादी शिवाजी कागनीकर म्हणाले नशेच्या पदार्थामुळे माणसाचे आरोग्य तर बिघडतेच कुटुंबांचे आर्थिक स्थिती खालावते सामाजिक स्वास्थ देखील बिगडते. दारूच्या आहारी जाऊन सुखी असलेली कुटुंब दुखी बनली आहेत . तामिळनाडू गुजरात या राज्यातून दारू बंदी तशीच कर्नाटकात देखील झाली पाहिजेत अस देखील कागनीकर म्हणाले.यावेळी सदाशिवराव भोसले जेष्ठ विधी तज्ञ राम आपटे .आदि उपस्थित होते.
राज्यात दारु बंदी झाल्यास सर्वात प्रथम सर्वसामान्य कामगार वर्गातील महिला व त्यांची मुल सरकारला धन्यवाद देत समाधानी होईल.यात यंत्रमाग,बांधकाम विभागात काम करणारे तसेच इतर विभागातील कामगार वर्ग इतका गर्क झालाय कि रोज काम करुन पैसे घेऊन जातात आणी पुर्ण दारुत संपवतात.त्यामुळे कुटुंबातील वाताहत पहावत नाही.शहापूर पोलीस ठाणे हद्दीत जास्तीत जास्त सामान्य कामगार वर्ग असल्याने सर्वात जास्त दारु दुकान इथेच आहेत.यावरुन अस वाटत कि अबकारी खात्याने सर्वसामान्यांची वाटच लावायची ठरवलय त्यात कर्नाटक शासनाची सहमती अस दिसतय.