सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील सिटीझन फोरम ने कामगार मंत्री संतोष लाड यांची भेट घेतली. ई एस आय सुविधांच्या बाबतीत बेळगाव शहर आणि परिसरातील कामगारांची होत असलेली आबाळ त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
आरोग्य सुविधा नाहीत, खासगी इस्पितळात उपचार करून घेतले तर लवकर बिले मिळत नाहीत अशा काही महत्वाच्या गोष्टी त्यांना दाखवून देण्यात आल्या. यावेळी बोलताना ई एस आय सुविधा सुधारण्याच्या बाबतीत आम्ही लक्ष देत आहोत, कामगारांचे कल्याण आणि हित यासाठी काळजी घेण्यात येईल असे संतोष लाड यांनी सांगितले. लवकरच कामगारांच्या साठी स्पेशल सुविधा आठवडा भरात जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल.
यावेळी सेवंतिभाई शाह, अरुण कुलकर्णी, विकास कलघटगी सह कॉंग्रेसचे जयराज हलगेकर देखील यावेळी उपस्थित होते.