बेकायदेशीर रित्या वास्त्यव्यास असलेल्या १२ बांगलादेशी नागरिकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे बेळगाव जवळील देवराज अर्स कॉलनीत कोणतेही कागदपत्रे नसताना ते राहात होते त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतल आहे . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्क महिला आणि तीन बालकांचा यात समावेश असून ऑटो नगर येथील कत्तल खाण्यात कामास होते अशी देखील माहिती समोर आली आहे .
या सगळया चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पोलिसांनी अजून याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही . गेल्या चार महिन्या पूर्वी ऑटो नगर येथील कत्तल खाण्यात काम करणाऱ्या १३ जणांना अटक केलेल्या घटनेची यामुळे पुन्हा एकदा आठवण झाली आहे सदर प्रकरणाचा तपास करत बेळगाव पोलिसांनी ही केस आंतरिक सुरक्षा विभागाकडे (आय एस डी) बहाल केली होती .
तत्कालीन डी जी पी रुपकुमार दत्ता यांनी सूचना देत सादर केस चा तपास आंतरिक सुरक्षा विभागाकडे देण्याचा आदेश दिला होता त्यानुसार आता हि केस हेच विभाग हाताळणार आहे.