कर्नाटक व्याप्त भू भाग माझ्या महाराष्ट्राला जोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. तीन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात करताना महाराष्ट्र सीमेवरील शिनोळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिव सेनच्या वतीने उद्धव ठाकरे याचं जल्लोषी स्वागत करण्यात आल. त्यानंतर ठाकरे यांनी सीमेवरील शिव सेनेच्या ताब्यात आलेली ग्राम पंचायतिच्या कार्यक्षेत्रात शिव पुतळयाच अनावरण केल. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत महाराष्ट्र सरकारवर देखील दणकून टीका केली.
बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे शिव सेनेच वचन आहे हा माझा मराठी भू भाग आहे मी सीमा भाग म्हणत नाही सीमा आपल्या देशाला आहेत हा देशातला मराठी मत भगिनींचा भू भाग आहे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र मानतो तो माझ्या महाराष्ट्राला जोडणारच हे शिव सेनेच वचन आहे असही ते म्हणाले.
महापौर संज्योत बांदेकर माजी महापौर सरिता पाटील किरण सायनाक,नगरसेवक पंढरी परब रतन मासेकर विजय भोसले यांच्यासह समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील यांनी शिनोळीत तर मध्यवर्ती एकीकरण समितीचे देपक दळवी मनोहर किनेका मालोजी अष्टेकर आदींनी विमान तळावर ठाकरे याचं स्वागत केल.