Wednesday, February 12, 2025

/

उत्तर कर्नाटक विकास केलाय वेगळ्या राज्याची मागणी सभागृहात नको मुख्यमंत्र्याच कत्तीना उत्तर

 belgaum

vidhan sabhe-Uttar karnatakaजनतेला दिलेली आश्वासने प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे . जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे अस सिद्धरामय्या म्हणाले गुरुवारी दुपारी विधान सभेच्या सभेत नंजुडप्पा अहवाल उत्तर कर्नाटक विकास यावर चर्चा करताना ते बोलत होते.

आमच्या कार्यामुळे ,राबविलेल्या योजनांमुळे विरोधक हताश झाले आहेत . त्यामुळे विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत . हैदराबाद कर्नाटक भागाच्या विकासासाठी तीन हजार कोटीहून अधिक निधी मंजूर केला असून त्यापैकी दोन हजार कोटीच्या निधीचा विनियोग झाला आहे . त्या भागातील विद्यार्थ्यांना आरक्षण देखील देण्यात आले आहे . मेडिकल आणि इंजिनियरिंग प्रवेशासाठी आरक्षण देण्यात आले आहे . त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना मिळाला आहे .,असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या  विधानसभेत म्हणाले .

संपूर्ण कर्नाटकाचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे . असे असताना उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य पाहिजे म्हणून कशाला मागणी करता म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आमदार उमेश कत्तीना सवाल केला . बेळगावात एकीकरण समिती पेक्षा तुमचाच आवाज अधिक होत आहे यापुढे तुम्ही उत्तर कर्नाटक वेगळया राज्याची मागणी सभागतुहात करू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.पूर्वी सरकारी मेडिकल कॉलेजची संख्या चार होती आता हीच संख्या सतरा झाली आहे . मी म्हशी पाळतो . बकरी पालन देखील खूप फायदेशीर आहे . तुम्ही देखील बकरी पालन करून पहा म्हणून सिद्धरामय्या विधान परिषद अध्यक्ष कोळीवाड याना म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.