बस डे चे उदघाटन करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या अधिवेशनाला बसने जाणार याची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री रमेशकुमार हे थेट बंगळूर हुन बेळगावला कर्नाटक बसने प्रवास करून आले आहेत. याकडे कुणीच जास्त लक्ष दिलेले नाही.
प्रकार असा झाला की रमेशकुमार हे शुक्रवारी बंगळूर ला गेले होते. तेथे जात असतानाच त्यांची प्रकृती बिघडली होती. बंगळुरात गेल्यावर त्यांना अडमीट करावे लागले. रविवारी रात्री इस्पितळातून बाहेर पडून रेल्वे पकडण्यात त्यांना उशीर झाला त्यामुळे गाडी चुकली
महत्वाची कामे अधिवेशनातील कामकाज असल्याने त्यांना बेळगाव ला अधिवेशनासाठी येणे आवश्यकच होते, यासाठी त्यांनी जोडीला आपला गन मॅन घेतला आणि आज सकाळी ते बसने बेळगावला पोचले आहेत.रात्रीचा प्रवास साध्या बसने करताना त्यांना बस वाहकांनी चांगली सुविधा उपलब्ध करून दिलो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.के एस आर टी सी च्या बस डे च्या आदल्या रात्रीच म्हणजे मुख्यमंत्री बस प्रवास करण्या अगोदरच रमेश कुमार यांनी बस प्रवास केला आहे.
एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत फिरताना ताफा घेऊन रहदारी आडवणारे चिल्लर मंत्री कुठे आणि अधिवेशनाचे कामकाज चुकू नये म्हणून बसने आलेले आरोग्यमंत्री कुठे?