महाराष्ट्र एकीकरण समितीला सोडून भाजप प्रवेश करण्याच्या माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला असून उद्या सोमवारी 20 रोजी संकम हॉटेल मध्ये याला मुहूर्त मिळाला आहे.
माजी मुख्यमंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा यांच्या उपस्थितीत सुंठकर यांच्या बरोबर वकील मूळवाड्मठ देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी हॉटेल संकम मध्ये दुपारी साडे बारा वाजता महानगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीत सुंठकर यांना पक्ष प्रवेश दिला जाणार आहे. सुरुवातीला हिरेबागेवाडी येथील परिवर्तन यात्रेत हा प्रवेश होणार असल्याची माहिती होती मात्र संकम मधील बैठकीत प्रवेश देण्याचे ठरविण्यात आले आहे.शहापूर येथील सभेत प्रवेश देण्यास देखील स्थानिक भाजप अनुकूल नसल्याने शेवटी हॉटेल संकम मधील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा प्रवेश दिला जाणार आहे.बेळगाव live ने सर्वप्रथम सुंठकर भाजपच्या वाटेवर अशी बातमी दिली होती गेल्या एप्रिल आणि जून महिन्यातच live सर्व प्रथम सुंठकरांच्या भाजप प्रवेशाची वाचा फोडली होती आता ती बातमी खरी होताना दिसत आहे.live घातलेल्या जुन्या बातम्यांचे लिंक आपण पाहू शकता…