Saturday, January 11, 2025

/

बापट गल्लीतील बहुमजली पार्किंग गैरसोयीचे!!

 belgaum

शहरातील वाढती रहदारीची समस्या प्रशासनाला डोकेदुखी ठरल्याने बापट गल्ली कार पार्किंग मध्ये बहुमजली वाहन तळ करण्याचा निर्णय महा पालिकेने घेतला आहे मात्र मुळातच निवडलेली ही जागा गैरसोयीची असून ती मध्य वस्तीत असल्याने निरुपयोगी ठरणार आहेCar parking

बाजार पेठेतील या जागेची बहु मजली पार्किंगसाठी  निवड केल्याने भविष्यात  समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता तीन कोटींचा निधी स्मार्ट सिटी योजनेतून वापरला जाणार आहे केवळ निधीची उपलब्धता पाहूनच (नाल सापडला म्हणून घोड्याची खरेदी) अशी स्थिती या प्रकारात दिसून येत आहे.

बेळगाव शहर हे एक जुन्या शहरांपैकी असून ग्रामीण ढाच्यात रुजलेला आहे लहान रस्ते,अरुंद गटारी अशी मध्यवर्ती शहराची रचना आहे यात एकदम बदल करता येणे शक्य नाही एका रात्रीतच बेळगाव स्मार्ट होऊ शकत नाही. शहराच्या उपनगरांचा विकास झपाट्याने होत आहे मात्र जून शहराचा मागासपणा वाढतच चालला आहे त्यामुळं शहरातील रहदारीची समस्त सर्वसामान्यांना त्रासदायक आहे हें कोणीही नाकारू शकत नाही.
पूर्वी शहरात  येणाऱ्या वाहनांची संख्या निमित्त मात्र होती त्यामुळे अनसुरकर गल्लीत  खाजगी मालकीत (लक्ष्मी अड्डा) बैलगाड्या सोडल्या जात होत्या मात्र आता तीच जागा कार पार्किंग नी घेतली आहे. ग्लोबलायजेशन मूळ, बँकांनी वाहन कर्जासाठी हात सैल सोडल्याने चार चाकी दुचाकींची संख्या प्रचंड वाढली आहे.
माजी आमदार रमेश कुडची यांच्या कार्यकाळात कॉलेज रोडवर लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला मात्र त्याचा वापर जनतेने न केल्याने काढून टाकला होता तीच गत या प्रस्तावित बहुमजली पार्किंगची होणार आहे त्यामुळे हा प्रकल्प न राबवता आहे त्यात सुधारणा करणे सोयीचे ठरेल. सध्या दुसऱ्यांदा टेंडर कॉल करण्यात आला असून या प्रोजेक्ट्ला स्थानिक लोकांचा देखील  विरोध वाढण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.