सध्या बेळगाव शहरातील समिती नेते आणि कार्यकर्ते एक वेगळ्या मिशन वर आहेत. भाजपने तिकिटाचे आमिष पुढे एका तालुका समितीच्या नेत्याला आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या नेत्याला जरा थांबा आणि विचार करा असे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीला दुबळे करण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला आहे, मात्र तिकीट देऊन किंवा न देऊन मराठी माणसाची कोंडीच करण्यात आली आहे. यामुळे आपल्या मातीशी इमान राखून जगत राहणेच योग्य ठरू शकते. मराठी माणसाच्या बाजूनेच जर बोलतेस येत नसेल तर तशा पक्षात जाणे काय कामाचे?
या नेत्याने तर समितीच्या जोरावर मोठ्या पदांचा लाभ उठवला आहे. समितीच्या अनेक आंदोलनात आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल होऊन आंदोलने यशस्वी केली आहेत. आमदारकीचा लाभ झाला नाही तीन वेळा वेगवेगळ्या कारणांनी पराभवच पत्करावा लागला, बहुसंख्य मराठी मतांचे विभाजन झाले. आता पुढे निवडणूक असताना भाजप च्या गोटात प्रवेश करून नेमकं काय होणार?
या नेत्याने आणखी थोडी कळ सोसावी लागेल. काही सदस्य विरोधात आले म्हणून आपण घर सोडत नाही याचाही विचार करावा, अन्यथा मराठी भाषिक आणि म ए समितीशी ती प्रतारणा ठरेल.
मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही हे ध्यानात घ्या.
Trending Now