Saturday, December 28, 2024

/

आपल्या मुलास “समजून” घेण्याची गरज !!! – आपण नाही, तर कोण? आता नाही, तर कधी?

 belgaum

अभिनंदन!!! आपणास मूल होणार आहे..

CHildrens dayआपल्या डॉक्टर, पतीपत्नी किंवा आपल्या पालकांकडून ही बातमी मिळण्याचा क्षण रोमांचकारी असतो. आपण जगाच्या वर आहोत असेच या क्षणाचे वर्णन करावे लागेल. लवकरच, आपल्याभोवती असलेले जग बदलू लागले. यानंतर आपल्या प्रियजनांकडून आपणांवर शुभेच्छा व आशीर्वादांचा वर्षाव सुरु होतो. तुम्ही या क्षणाच्या प्रतिक्षेतच असता, नाही का? यानंतर नियमित व कोटेकोरपणे वैद्यकीय तपासण्या सुरु होतात. बाळाच्या आगमनास प्राधान्य देऊन त्याची प्रतीक्षा सुरु होते. अलौकिक बुद्धिमतेची व्यक्ती जन्मण्यासाठी सारी योजना सिद्ध झाल्यानंतर अखेर तो दिवस येतो जेव्हा तुम्ही आपल्या नवजात अपत्याचा पहिला आवाज ऐकता. यापूर्वी कधी नव्हते असे परिपूर्तीचे हास्य आपल्या चेहऱ्यावर उमळते. बाळासह तुमचा नवा प्रवास सुरु होतो. आपल्या अलौकिक बाळासाठी यानंतरचे दिवस व रात्र जाऊ लागतात. बाळाच्या मजेदार, सुंदर, निष्पाप, आणि आपल्याप्रमाणेच खोडकर विभ्रमात तुम्ही हरवून जाता.

मुलांची जसजशी वाढ होऊ लागते तसतशा त्यांचाबाबतच्या इच्छा आकांक्षाही बळावत जातात. आपल्याकडून होणारे गुणगान, मिळणारे उत्तेजन मुलांना अधिक काही करण्यास ऊर्जा पुरविते. मुलातील कमतरता कोणत्या गोष्टी त्याला करता येत नाहीत किंवा करण्यास वेळ लागतो हे एव्हाना आपल्या धान्यात येऊ लागलेले असते परंतु आपले सारे लक्ष त्याने कोणत्या गोष्टी आत्मविश्वासाने केल्या आहेत यावरच केंद्रित असते. सातत्याने त्याचा अभिमानही आपण बाळगत असता. आपल्या मुलात तुम्ही खूप स्वप्ने पाहता आणि ते मोठे होत असताना त्याची परिपूर्ती होण्याची आकांक्षा बाळगता.

काही वर्षे जातात, मूल मोठे होते आणि तुम्ही शैक्षणिक आणि इतर उपक्रमासंदर्भात समाज, शाळा, कुटुंब पातळीवर आपल्या मुलाची तुलना मूल्यमापन करू लागता. आपणास आपले मूल, आपल्या अपेक्षा पूर्ण करीत आहे असे वाटत नाही. आपल्या मुलाचा ठायी मोजक्या सकारात्मकबाबी आणि अमर्याद त्रुटी आहेत असे वाटू लागते. मूल मागे पडत आहे या जाणिवेने आपण अस्वस्थ होता.

नेमके इथेच आपल्या मुलांबरोबर विचारपूर्वक चर्चा करण्याची वागण्याची गरज आहे. त्यांच्याशी बोला, त्यांच्यातील गुणांना, त्यांच्या आवडीला प्रोत्साहन द्या. म्हणूनच साऱ्या पालकांना मी सांगू इच्छितो कि, आपल्या मुलाची पूर्णव्याख्या करण्याची हीच ती वेळ आहे कारण आपण नाही, तर कोण? आता नाही, तर कधी?

मुलांचा विकास हा त्यांच्यावर तुम्ही किती पैसे खर्च करता यावर अवलंबून नाही परंतु त्यांच्यावर किती तुमचा अनमोल वेळ खर्च करता यावर अवलंबून आहे.

आयुष्य तुम्हाला धडे शिकविते हे समजून घ्या. आपले वय कितीही असो अनुभवाने आपली निर्णय क्षमता भक्कम होते. परंतु आपण आपल्या जीवनात काही चुकीचे निर्णय आपणास नवे अनुभव देऊन जातात व त्यातून बरचकाही शिकवतात. नेमके हेच मुलांच्याबाबतीतही घडते. तुम्ही त्यांना कितीही प्रशिक्षित करा, त्यांना जागाकडून नकाराचा सामना करावाच लागतो.

प्रत्येक मूल हे वैशिष्टयपूर्ण असते व त्यांच्याकडे काही गुणवत्ताही असते ते केवळ पालकांची प्रतिकृती नसते. बहुतेक पालकांची समज आहे, “हे मला जमू शकते, तुला का नाही” किंवा “हे मी करू शकलो नाही, तू कर” अशा पद्धतीची समाज पालक मुलांच्या बाबतीत बाळगतात.

“तुमचा मुलाचे मानसिक आरोग्य हे त्याला मिळणाऱ्या श्रेणीहुन महत्वपूर्ण आहे.”

आजच्या जगात मुले अधिक स्पर्धेचा आणि कौटुंबिक दबावाचा सामना करीत आहेत. गलेलठ्ठ पगार देणाऱ्या नोकरीची अपेक्षा व पालकांच्या अवास्तव मागण्या यामुळे आपल्या भारतातील विद्यार्थीवर्गात आत्महत्येची साथ पसरली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) निर्वाण्यानुसार भारतात जगातील इतर देशांपेक्षा मोठ्या संख्येने आत्महत्या होतात. तरुण व वयस्कात आत्महत्या अधिक आढळतो. कधीकधी त्याच्यामागे असे कारण असू शकते की मुलाला योग्य पालकत्वाचा अभाव असल्याने आपल्या समाजात या घटना घडतात. मुलांना कधीही अपयश किंवा नकार कसे हाताळता येईल ते शिकवले जात नाही. त्यांना कायम विजयाची श्रद्धा जोपासण्याची सवय आपण लावतो. अशावेळी पालक व मुलांचे समुपदेशन होणे देखील आवश्यक ठरते. केवळ पालक किंवा शाळा मुलांना मानसिक व मानवशास्त्रीयदृष्ट्या अपयशाचा सामना करण्यास तयार करीत नाहीत यामुळे समाज म्हणून हे गरजेचे ठरते कि, आपण एक प्रकारचे सकारात्मक वातावरणास तयार करून ज्यांच्यात वयक्तिक पातळीवर आत्महत्येची प्रवृत्ती दिसते किंवा जे मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त आहेत त्यांना मदत करावयास हवी. आपल्या मुलास समजून घेण्याची, त्यांच्याशी योग्य व्यवहार करण्याची, त्यांचे स्वास्थ्य नीटपणे समजून घेण्याची हीच वेळ आहे. त्यांना आपला पुरेसा वेळ द्या अन्यथा हि केवळ सुरुवात असेल आणि त्यानंतर अनेक घरात आत्महत्येची घटना घडू लागतील. सुधार घडवण्याची वेळ केव्हाच टळलेली असेल. “यशस्वी असण्यापेक्षा समाधानी अधिक महत्वपूर्ण आहे” कारण हाच मूलमंत्र तुमच्या मुलास आयुष्यभर आनंदात ठेऊ शकतो. त्यांनी जे कार्यक्षेत्र निवडले आहे, तेथील नकार व अडचणींचा सामना करण्यास त्यांना तयार करतो.

“तुमच्या मुलास स्वतःच्या शिक्षणापर्यंतच मर्यादित करू नका, कारण मूल वेगळ्या काळात जन्मास आले आहे.” – रवींद्रनाथ टागोर

या गोष्टी इतक्या सरळ नाहीत जे आम्ही समजतो आणि प्रत्येक पालकाला ती भावना असेल परंतु आजच्या पिढीसाठी हे आवश्यक आहे कि, त्यांना मजबूत, कणखर, आणि खंबीर बनवण्याची खरी गरजही आज आहे. हे जर तुम्ही केले नाही तर तुमच्या मुलासाठी इतर कोणीही करणार नाही. योग्य मार्गदर्शना अभावी आपले मूल नैराश्यग्रस्त बनेल. त्याला वैफल्यादी येईल, त्यावेळी पालक म्हणून आपले काय चुकले असे वाटत राहील.

आपल्या मुलाला योग्य पालकत्व बहाल करण्यासाठी आत्ताच कृती करा. आपण त्यांच्यावर प्रेम करतो हे त्यांना खुल्या मानाने सांगा. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे ते अलौकिक व एकमेवव्दितीय आहेत हे त्यांना समजवा.

बालदिनाच्या शुभेच्छा!!

तेजस कोळेकर.
9916835550

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.