गुरुवारचे विधान परिषदेचे कामकाजाची सुरुवातच गोंधळाने झाली यावेळी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यात वाद झाला. सरकार लोकांचे जीव वाचवण्यासाठी असतंय मात्र लोकांचे जीव सुरक्षित नसतील तर सरकार कशाला पाहिजे असा प्रश्न उपस्थित करत भाजप जे डी एस आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. प्रश्नोत्तराचा अवधी संपल्यावर अतिरिक्त वेळेत या विषयावर चर्चा करू अस कायदा मंत्री टी बी जयचंद यांनी सभागृहास सूचित केले.
राज्यभर सुरू असलेल्या खाजगी डॉक्टरांच्या संपा मूळ अनेक ठिकाणी रुग्ण दगावत आहेत असा आरोप विरोधकांनी केला आहे.के पी एम ई विधेयक मंजुरीसाठी प्रस्ताव आल्यावर ही चर्चा रंगली .डॉक्टर्स राज्यभर संप करत असताना रुग्ण दगावत आहेत हे पहिल्यांदाच होत आहे असं विरोधी पक्ष नेते के एस ईश्वरप्पा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
आरोग्य मंत्र्यांनी जबाबदारीने वागायला हवं, सरकारला देखील आपली जबाबदारी कळली पाहिजे तर खाजगी डॉक्टर्स ना सामाजिक जबाबदारीच भान कळायला हवं तत्पर डॉक्टरांनी आंदोलन थांबवून जनतेच्या सेवेला जावं अस विधान देखील ईश्वरापा यांनी सभागृहास संबोधन करताना आंदोलक डॉक्टरना सल्ला दिला.मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी ताबडतोबड डॉक्टर्स सोबत बैठक करून समस्येवर तोडगा काढावा अस देखील ते म्हणाले
.