शहरात अधिवेशनास बंदोबस्तासाठी आलेले ५ हजार हुन अधिक पोलीस असताना देखील बुधवारी रात्री खडक गल्ली भागात दोन गटात झालेल्या दगडफेक जाळपोळीच्या घटने नंतर गुरुवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक कमल पंत यांनी मार्केट पोलीस स्थानकास भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली .
मार्केट पोलीस स्थानकावर खडक गल्ली भागातील दोन्ही गटांनी अतिरिक्त पोलीस महा संचालक कमल पंत यांच्याशी चर्चा करत निष्पाप युवकावर गुन्हे घालू नकीच अशी मागणी केली . गेल्या दहा दिवसात या भागात तिसरी वेळ दगडफेकीची घटना घडली असून यावर कायम स्वरूपी तोडगा काढा अशी मागणी भाजप उत्तर अध्यक्ष श्रीनिवास यांनी केली प्रत्येक वेळी पोलीस दोन्ही कडच्या पाच पाच मुलाना अटक करताट प्रकरणाकडे दुर्लसख करत्यात त्यामुळे वारंवार असे प्रकार होत असल्याची तक्रार देखील यावेळी करण्यात आली
बुधवारी रात्री दंगलग्रस्त भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे पोलिसांनी जालगार गल्ली खडक गल्ली भागात रस्त्यावर पडलेले दगड विटा काचांच्या बाटल्यांचा खच साफ सफाई केली सध्या या भागात तणाव पूर्ण शांतता आहे .
गुरुवारी सकाळी खडक गल्ली भागातील एका गटाच्या महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत निष्पाप युवकांची धरपकड बंद करा अशी मागणी करत समाज कंटक दुसऱ्या भागातून आले होते त्यांना गजाआड करा अशी मागणी केली . तर मार्केट पोलीस स्थानकात एका दुसऱ्या गटांच्या महिला निष्पाप युवकांची धरपकड बंद करा अशी मागणी केली दोन्ही गटांनी संशयितांची यादी पोलिसांना सुपूर्द केली आहे .
सी सी टी व्ही आणि व्हीडिओ रिकॉर्डिंग पाहूनच पोलीस अटकेची कारवाई करत असून याचा तपास सुरु आहे आता पर्यंत १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं रात्री उशिरा पर्यंत सर्वाना अटक केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी माहिती दिली आहे.