खडक गल्ली जालगार गल्ली घी गल्ली परिसरात दोन गटात तुफान दगडफेक सुरू असून हा या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.
टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने दोन गटात तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली होती त्यानंतर काही दिवस हा भाग शांत होता मात्र बुधवारी रात्री या भागात पुन्हा तुफान दगडफेक जाळपोळ झाली असल्याने पुन्हा एकदा समाज कंटकांनी हा भाग वेठीस धरला आहे. बुधवारी रात्री सुरू झालेली दगडफेक नेमकं कोणत्या कारणाने सुरू झाली याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही.
घटना स्थळी तणाव पूर्ण स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी या भागात धाव घेतली आहे.ऐन अधिवेशन काळात या परिसरात दोन गटात संघर्ष सुरू झाला आहे.पोलिसांनी अश्रू धुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या गेल्या आहेत.अनेक गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आली असल्याने समाज कंटकांनी पुन्हा एकदा या भागास वेठीस धरले आहे.
खडक गल्ली भागातुन या घटनेचे लोण चव्हाट गल्ली भडकल गल्ली इतर भागात देखील पसरले होते त्यामुळे लोकांची भागम भाग सुरू झाली होती. या भागातील इलेक्ट्रिक सिटी देखील काही काळा साठी बंद झाली होती समाज कंटक बाहेरून आली असल्याची चर्चा आहे.