काळ्या दिनात सहभागी झालेल्या मराठी भाषिक नगरसेवकां विरुद्ध कारवाई साठी बेळगावातील हिवाळी अधिवेशनात नवीन कायदा बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी याच अधिवेशनात नवीन कायदा बनविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
बुधवारी विधान सौध मध्ये आमदारांच्या बैठकीवेळो एका कानडी वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीत बेग यांनी राज्य म्युन्सीपल कायध्यात बदल करण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती दिली आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी रोशन बेग यांनी बेळगावात येऊन मराठी लोकप्रतिनिधीना जय महाराष्ट्र या घोषणा देणाऱ्या वर कारवाई करण्याचे वक्तव्य केले होते.
काळ्या दिनाच्या सायकल फेरीत महापौर संज्योत बांदेकर यांच्या सहजवळपास 18 मराठी नगरसेवकांनी सहभाग दर्शवला होता.
मागील वेळी महाराष्ट्रात माझे पुतळे करून प्रतिकृत्या जाळण्यात आल्या मात्र कोणतीही राज्य विरोधी कृत्य मी खपवून घेणार असल्याचं देखील बेग म्हणाले.पालिका आयुक्तांनी किती नगरसेवक काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झालेत याचा अहवाल दिला असून हा अहवाल मुख्यमंत्र्या समोर ठेऊन म्युन्सीपल कायद्यात बदल केला जाणार आहेस देखील रोशन बेग म्हणाले