Tuesday, January 7, 2025

/

परिवर्तन यात्रेत वयक्तिक घोषणा नको – व्यक्ती पूजकांच्या कानपिचक्या

 belgaum

आगामी 20 नोव्हेंम्बर रोजी बेळगावात होणाऱ्या परिवर्तन यात्रेच्या अगोदर बेळगाव भाजप मध्ये अंतर्गत धुसफूस वाढली असून परिवर्तन यात्रे दरम्यान कार्यकर्त्यांनी केवळ मोदी आणि येड्डीयुरप्पा यांच्याच घोषणा द्याव्यात व्यक्ती पूजकांनी कोणत्याही वैयक्तिक नेत्यांच्या घोषणा देऊ नये अशा शब्दात बेळगाव महानगर भाजप प्रभारी शंकरगौडा पाटील यांनी कानपिचक्या काढल्या आहेत.

परिवर्तन यात्रेच्या तयारी साठी  कन्नड साहित्य भवन येथे भाजपच्या उत्तर दक्षिण भागातल्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ते मार्गदर्शन करत होते.जिल्हा भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी यांच्या अध्यक्षतेखाली या  बैठकीचे आयोजन केले होते.

निवडणूक अजून सहा महिने लांब आहे त्यामुळे  उमेदवारी कुणाला ते पुढे पक्ष श्रेष्ठी ठरवतील त्यामुळे आताच मला तिकीट मिळाले अस कुणीही समजू नये ज्यावेळी उमेदवारी जाहीर होईल त्यावेळी सर्वजण मिळून काम करू असंही ते म्हणाले.

सध्या बेळगाव उत्तर आणि दक्षिण मध्ये भाजपातून अनेकजण इच्छुक असून एकमेकांत तिकिटासाठी रस्सीखेच लागली आहे .एका मतदार  संघातील इच्छुकांने तिकिटासाठी लॉबिंग करणाऱ्या इच्छुकांना 20 नंतर बघून घेऊ अशी थेट धमकी जिल्हा अध्यक्षा समोरच भाषणातून दिल्याचा प्रकार देखील दोन दिवसापूर्वी घडला होताअशी देखील माहिती उपलब्ध झाली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.