मोठा गाजावाजा करून बेळगावात भरवण्यात आलेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेधनाच्या पहिल्या दिवशी फक्त ४६ सदस्य उपस्थित होते. ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
मंत्री के जे जॉर्ज यांच्या राजीनाम्याची मागणी करून विरोधकांनी हंगामा केला, डीएसपी गणपती यांच्या आत्महत्या यांच्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा के एस ईश्वरप्पा यांनी उचलून धरला होता,
काँग्रेस चे एम एल सी उग्रप्पा यांनी यात हस्तक्षेप करून सरकारने याबद्दल केलेल्या कारवाईचे स्वरूप स्पष्ट केले, यावेळी सी एम इब्राहिम यांनी उत्तर कर्नाटकच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.