मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात असंविधानिक शब्द वापरल्याचा आरोप करत धनगर समाजाच्या वतीने ग्रामीणचे भाजप आमदार संजय पाटील यांच्या विरोधात निदर्शन केली.
राज्य धनगर समाजाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र सन्नक्की यांच्या नेतृत्वाखाली कित्तूर चनम्मा चौकात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आमदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्याविरोधात राजकीय टीका करावी याला आमचा विरोध नाही परंतु मुख्यमंत्र्यांच्या जाती धर्माबद्दल वयक्तिक बाबतीत वक्तव्य केल्यास धनगर समाज कदापि सहन करून घेणार नाही असे मत राज्य धनगर समाजाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र सन्नकी यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्र्याविरोधात असंविधानिक शब्द प्रयोग केल्यास सावधान असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
जैन धर्माच्या शिकवणीनुसार आमदार संजय पाटलांनी अहिंसा पाळावी,जैन धर्मात जन्म घेऊन केवळ राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यावर असंविधानिक शब्द वापरू नयेत याचा धनगर समाज निषेध व्यक्त करत आहे असे म्हणत या विरोधात धनगर समाज राज्यभर आंदोलन करणार असेही ते म्हणाले.