अधिवेशनाची जत्रा १३ पासून सुरू होईल. बंदोबस्तासाठी पोलीस खाते सज्ज झाले आहे. बंदोबस्त ड्युटी साठी ३५०० पोलिसांना नेमण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त टी जी कृष्णभट्ट यांनी ही माहिती दिली. २ पोलीस आयुक्त, ७ पोलीस प्रमुख, १३ अतिरिक्त पोलीस प्रमुख, ३३ डीएसपी, ९७ पोलीस निरीक्षक, २१५ उपनिरीक्षक, १९ महिला उपनिरीक्षक, २८४ सहाय्यक उपनिरीक्षक, २७२० हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल, २०० महिला कॉन्स्टेबल कार्यरत राहणार आहेत.
सुवर्ण विधानसौध तसेच इतर भागात त्यांना नेमले जाणार आहे. बॉम्ब शोधक आणि नष्ट करणारी पथके तसेच राखीव दलाच्या तुकड्याही काम करणार आहेत.