बेळगाव शहरातून राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धातून नेतृत्व केलेल्या खेळाडूंची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यातच यातील अर्धे खेळाडूना प्रशिक्षित करण्याचा मान एकट्या या बेळगावच्या द्रोणाचार्याना जातो. रविकांत मालशेट असं या क्रिकेट प्रशिक्षकाच नाव असून ते शाळेतील क्रीडा शिक्षक, क्रीडा पत्रकारिता ते क्रिकेट प्रशिक्षक अशी तिहेरी भूमिका बजावत असतात आणि बेळगावात विजया क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूना क्रिकेटचे धडे देत असतात.मालशेट यांच्याच भात्यातून तयार झालेला वैभव गोवेकर यांची गोवा रणजी संघात निवड झाली आहे सेनादला विरुद्ध होणाऱ्या रणजी स्पर्धेत तो गोव्याकडून खेळणार आहे. दीपक चौगुले याने १७ वर्ष खालील आशिया स्पर्धेत एकदा तर १९ वर्ष खालील विश्व कप दोनदा भारतीय टीम मध्ये स्थान मिळवलं होत याशिवाय त्याने कर्नाटक रणजी संघात देखील तो खेळला होता सर्वात अगोदर मिलिंद चव्हाण यांनी १३ वर्ष खालील कर्नाटक तर गोव्याच्या रणजी संघात अनेक सामने खेळले होते.
रणजी संघात निवड झालेला वैभव गोवेकर हा गोव्यातील सरस्वती डिग्री कॉलेजमध्ये शिकत असून त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण सेंट पॉल शाळेत झाले आहे बेळगावातील प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ विजयकुमार गोवेकर यांचा मुलगा आहे. १९ आणि २३ वर्ष खालील गोव्याच्या संघात खेळताना त्याने नेत्र दीपक कामगिरी केली होती त्यामुलेचेच त्याची १५ सदस्यीय रणजी टीम मध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती रविशंकर मालशेट यांनी बेळगाव live कडे दिली आहे.वैभव च्या निवडी नंतर मालशेट हे पुन्हा एकदा प्रशिक्षक म्हणून चर्चेत आले आहेत.प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचा देव सचिन घडवला अन आचरेकर सरांना जग ओळखू लागल तसच बेळगावात देखील अनेक अनेक द्रोणाचार्य आहेत त्यांच्या हातून देखील अनेक सचिन तयार होवोत हीच सदिच्छा …
संपर्क -रवी मालशेट
+919343165093