अतिवेगात चालवत असलेल्या कार गाडीचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन मेडिकल कॉलेजचे मित्र मैत्रिणी घटनास्थळीच ठार एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.रविवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कमकारहट्टी गावाजवळ ही घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के एल इ डेंटल कॉलेजची निशा (20) मूळ रा पटना, जे एन एम सी कॉलेज चा जयानंत रॉय (22) मूळ रा पटना अशी मयतांची नाव आहेत तर मूळचा पटना येथीलच जी आय टी कॉलेज मध्ये शिकणारा अंशुमन कुमार हा जखमी झाला आहे त्याच्यावर के एल ई इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हिरेबागेवाडी पोलिसात अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक एस सी पाटील अधिक तपास करत आहेत.
Trending Now