एक नोव्हेंम्बर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीतील तरुणांचा सहभागाने फक्त बेळगावातील राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांची झोप उडवली नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील दिगगज व्यक्तिमत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना देखील भुरळ लावली आहे.
शनिवारी सकाळी सांगली जिल्ह्यात पवारांना भेटलेल्या समितीच्या शिष्टमंडळां कडे त्यांनी काळ्या दिनात युवकांच्या सहभागा बद्दल समाधान व्यक्त केल आहे.यावेळी समिती नेत्यांनी पवारां सोबत सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा केली तसेच काळा दिन मोर्चात मराठी युवकांचा प्रचंड मोठा सहभाग आणी शातंतेत आपली महाराष्ट्रात सामील होण्याची भूमीका प्रकट केल्याबद्दल समाधान झाल अस ते म्हणाले.
येत्या 13 नोव्हेंबर रोजी कर्नाटकी अधिवेशना विरोधात होणाऱ्या मराठी महामेळाव्यात महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढेही निश्चित हजर रहाणार असे चर्चेत ग्वाही दिली.
मुंढे यांच्या सारखे तरुण नेतृत्व मेळाव्यास उपस्थित राहिल्यास सीमाभागातील मराठी तरुण पिढीला पुन्हा पाठबळ मिळेल त्यामुळे पुन्हा सक्रियपणे लढण्यास सिध्द होतील असे म्हटल्यावर मुंढे नक्कीच मेळाव्यास हजर राहणार असंही ते म्हणाले.
यावेळी मध्यवर्ती म ए समीती अध्यक्ष दिपक दळवी,खजिनदार प्रकाश मरगाळे,सदस्य राजू मरवे,सुनिल आनंदाचे,मारुती मरगाण्णाचे,पांडूरंग पट्टण हे उपस्थित होते.