काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झालेल्या महापौर संज्योत बांदेकर आणि इतर लोकप्रतिनिधी विरोधात कारवाई करा या मागणी साठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी दरपोक्ती वक्तव्य कन्नड रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष टी जी नारायण गौडा यांनी केली आहे.
बेळगाव दौऱ्यावर आलेल्या नारायण गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात गरळ देखील ओकली आहे.
महापौरा विरुद्ध क्रिमिनल केस दाखल करा त्यांनी समस्त कन्नड जनतेची माफी मागावी महापौर आणि इतर सदस्या वर कारवाई व्हावी अशी ते म्हणाले.
सथानीक राजकारणी राजकीय स्वार्थासाठी कन्नड चा बळी देत आहेत कन्नड भाषिक महापौर होत असताना देखील त्यांनी दुर्लक्ष केलं आहे अपल्या राजकीय स्वार्था साठी ते समितीला मोठं करत आहेत असा देखील आरोप त्यांनी केला आहे.
सरकारी नोकऱ्यात 80 टक्के कन्नड लोकांना आरक्षण मिळावं अशी मागणी करत डिसेंम्बर मध्ये आंदोलन करणार असल्याच देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे