नोव्हेंबर महिना सुरू झाला तसा थंडीचा कडाका वाढत चालला आहे. शुक्रवारी बेळगाव शहराचे किमान तापमान १४.२ या अंश सेल्सियस इतके खाली उतरले होते तर कमाल तापमान २८.३ अंश सेल्सियस इतके होते, सामान्य तापमानापेक्षा ४ अंशाने खाली तापमान सरकले असून ते आणखी खाली उतरणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
येत्या आठवड्यात हे तापमान कमाल २८ आणि किमान १४ पर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.यापूर्वी २०१२ च्या ८ नोव्हेंबर ला बेळगावात सर्वात कमी म्हणजेच ७.७ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
आता ओले नाक, सोललेले ओठ आणि गाल तसेच कोरड्या त्वचेवर उपाय करण्याची वेळ आली आहे.