मराठा लाईट इन्फंट्री च्या २३ आणि २४ बटालियनला लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते शानदार समारंभात ध्वज हस्तांतरण करण्यात आला. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी उपस्थित जवान अधिकारी यांच्या कडून मानवंदना स्वीकारली त्यानंतर उघड्या जीप मधून परेडच निरीक्षण केली. यावेळी बिपीन रावत यांच्या समवेत उपलष्कर प्रमुख कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफट जनरल पी जे एस पन्नू आणि मराठा सेंटरचे ब्रेगेडीअर गोविंद कलवड होते.
मेजर तळेकर क्वाटर गार्ड मध्ये आयोजित शानदार सोहळ्यात परंपरे प्रमाणे राष्ट्रपतींनी बहाल केलेल्या ध्वजांचे हस्तांतरण २३ मराठा चे मेजर सौरभ मोडक आणि २४ मराठा बटालियन मेजर करण जोसेफ बिपीन रावत यांच्या कडून स्वीकार केला. २७ वर्षा नंतर पुन्हा एकदा मराठा बटालियन ध्वज हस्तांतर करण्यात आला आहे. मराठा इन्फंट्री ने आठ युद्धातून सन्मान मिळवला असून पाच महावीर चक्र पाच अशोक चक्र ४४ वीर चक्रआणि १५ कीर्ती चक्र मिळवली आहेत
मराठा लाईट इन्फंट्री ही सैन्यातील एक जुनी बटालियन असून देशात आणि परदेशात मराठ्यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे अनेक युद्धात जय मिळवून सर्वोच्य बहुमानही मराठा सैन्याने मिळवला आहे अस मत बिपीन रावत यांनी परेड सामील जवानांना मार्गदर्शन करताना काढले.
शौर्याची अशी ऐतिहासिक पाश्वभूमी लाभलेल्या रेजिमेंट ला ध्वज प्रदान करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वताला भाग्यवान समजतो ध्वज प्रदान केल्या नंतर बटालियन ची जबाबदारी आणखी वाढली आहे शोर्य आणि त्यागाची परंपरातुम्ही निश्चितच पुढे चालू ठेवलं याची मला खात्री आहे असे देखील रावत म्हणाले.यावेळी माजी लष्कर प्रमुख जे जे सिंह , मराठा सेंटरचे देशातील अनेक वरिष्ठ अधिकारी,जे सी ओ, जवान,कोल्हापूरचे शाहू महाराज प्रादेशिक आयुक्त शिवयोगी कळसद,खासदार सुरेश अंगडी प्रभाकर कोरे,तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर आदी गणमान्य उपस्थित होते.