राज्योत्सव मिरवणुकीत हाणामारी झाल्याची घटना येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे घडली आहे. किरकोळ कारणावरून मारहाण झाली असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लक्कप्पा पुजारी असे जखमीचे नाव आहे. तो गोकाक तालुक्यातील आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवकावर कोणी हल्ला केला आहे, याचा पोलीस तपास घेत आहेत.
मिरवणुकी दरम्यान अनेक ठिकाणी आपापसात कार्यकर्त्यातून वाद आणि मारामारीच्या घटना घडतच होत्या दिवसभर अनेक ठिकाणी दारूच्या नशेत कार्यकर्ते भांडताना दिसत होते.
आर टी ओ सर्कल जवळ किरकोळ दगडफेक
आर टी ओ सर्कल जवळ सायंकाळी सातच्या सुमारास एका राज्योत्सव चित्ररथावर क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाल होता तुरळक दगडफेक झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने याकडे लक्ष देऊन या भागात निर्माण झालेला तणाव दूर केला आहे.