लोकशाहीच्या मार्गातून चालत असलेल्या सीमा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या मूक सायकल फेरीत सहभागी झाल्याच निमित्त करून पुन्हा एकदा कन्नड रक्षण वेदिकेच्या करुनाड सेनेच्या कार्यकर्त्यांनी महा पालिकेवर काही काळ लाल पिवळा ध्वज लावला होता. पोलीस संरक्षणात हा ध्वज कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी लावल्याने पोलिसाकडून बघ्याची भूमिका होती.
एक नोव्हेंबर रोजी सकाळी एकीकरण समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत महापौर संज्योत बांदेकर यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून सहभाग दर्शवून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सामील होण्याच्या भावना दाखविल्या आहेत त्यामुळेच पोटशूळ उठलेल्या कानडी सरकारने महापौरा विरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत .पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राज्योत्सव मिरवणुकी सहभागी झाल्या नंतर कन्नड वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत महापौरा वर कायदेशीर कारवाई करू अस स्पष्ट केल आहे.