Thursday, December 19, 2024

/

शहापुरातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा संकल्प

 belgaum
एक नोव्हेंबर काळा दिन आणि कर्नाटकी अधिवेशना विरोधात महा मेळाव्यास हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा संकल्प शहापूर येथील बैठकीत करण्यात आला.
सोमवारी सायंकाळी गाडे मार्ग शहापूर येथे समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते युवक आणि महिला उपस्थित होत्या.
shahpur meeting
मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी मूक मोर्चा आणि महा मेळाव्य संदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीत प्रशांत भातकांडे, शाम कुडूचकर,मदन बामणे,राजू पाटील राजू मरवे,रणजीत हवालानाचे नगरसेवक राजू बिरजे,राम भिंगुर्डे शारदा भेकने,राजेंद्र मुतगेकर आदींनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्रकाश मरगाळे नगरसेवक विजय भोसले विकास कलघटगी,अनिल धेन्गोलेआदिनाथ लाटूकर,शाहपूर भागातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.