नवीन घर बांधून कर्ज बाजारी झालेल्या विणकाराने नैराश्येतून आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी तेग्गीन गल्ली वडगांव येथे घडली आहे. उदय बसवणेप्पा हंगीरेक वय 43 वर्ष रा.तेग्गीन गल्ली वडगांव अस या आत्महत्त्या केलेल्या विणकराच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदय याने नवीन घर बांधण्यासाठी कर्ज काढले होते हात माग व्यवसाय व्यवस्थित न चालल्याने तो निराश होता यातून त्याने आपल्या राहत्या घरी हात मागाच्या अँगल का पोलिथॉन ची दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.त्याच्या पश्चात पत्नी मुलं अस परिवार आहे.शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
Trending Now