बेळगाव हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याचे सांगताना सीमाभागात 14 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य करून राहिलेल्या मराठी माणसाला महाराष्ट्र राज्यांचा रहिवासी दाखला मिळू शकतो आणि त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे अशी माहिती गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
हिंदवाडी येथील हिंदवाडी महिला मंडळाचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते.हा कार्यक्रम महावीर भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे ,विजया देवी राणे, महापौर संज्योत बांदेकर,मंडळाच्या अध्यक्षा आशा मनोहर उपस्थित होत्या.
बेळगाव अजून महाराष्ट्रात आले नसले तरी ते महाराष्ट्राचाच भाग आहे असे देखील केसरकर म्हणाले . प्रारंभी हिंदवाडी येथील महालक्ष्मी महिला मंडळ येथून लेजिम खेळाच्या तालात श्री महालक्ष्मी देवीची पालखी काढण्यात आली .जेष्ठ पत्रकार विलास अध्यापक यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे देखील प्रकाशन झालं.